औरंगाबाद- कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे औरंगाबाद शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पण पहिल्याच दिवशी चोरांनी पोलिसांच्या नाकावर टिचून डॉक्टराचे घर फोडले आहे. तब्बल 100 तोळे सोनं आणि 10 लाख रुपये असा सुमारे 50 ते 70 लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे.
शहरातील प्रताप नगर भागात ही घटना घडली आहे. डॉ.सुषमा सोनी (रा.प्रतापनगर, उस्मानपुरा) हे परिवारासह देवदर्शनासाठी बाहेर राज्यात गेले आहे. बंद घर असल्याची संधी साधत चोरट्यानी घराला लक्ष केले. घराचा समोरील दरवाजा तोडून चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला. घरामध्ये ठेवलेले सुमारे 100 तोळे सोन्याचे दागिने व रोख 10 लाख रुपये असे सुमारे 50 ते 60 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यानी लंपास केला आहे.
आज सकाळी जेव्हा घरातील काम करणारे नोकर साफसफाईसाठी आले. तेव्हा हा सर्व चोरीचा प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता, उपयुक्त निकेश खाटमोडे, उपयुक्त दीपक गिर्हेसह अनेक वरिष्ठ अधिकारी घटनस्थळी दाखल झाले आहेत.

बातमी शेअर करा