बीड : दिल्ली पोलिसांनी टूल किट प्रकरणात एफआयआर नोंदवलेला आणि मूळचा बीडचा रहिवाशी असलेला पर्यावरणवादी कार्यकर्ता शंतनू मुळूक याने दिल्लीच्या पतियाळा हाऊस न्यायालयासमोर अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्याच्या याचिकेवर उद्या (दि. २४ ) सुनावणी होणार आहे. शंतनू मुळूक याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १७ फेब्रुवारी रोजी १० दिवसांचा ट्रान्झिट जामीन दिला होता.
बीडचा रहिवाशी असलेल्या शानातनू मुळूक याच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी कथित टूल किट प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. शंतनू मुळूक च्या शोधासाठी दिल्ली पोलीस बीडमध्ये आले होते, त्यानंतर शंतनूला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १७ फेब्रुवारी रोजी १० दिवसांचा ट्रान्झिट जामीन मंजूर केला होता. त्यानंतर शंतनूने या प्रकरणाच्या चौकशीत देखील उपस्थिती लावली.
शंतनूने आता अटकपूर्व जामिनासाठी दिल्लीच्या पतियाळा हाऊस न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर न्या. धर्मेंद्र राणा यांच्यासमोर उद्या (दि. २४ ) सुनावणी होणार आहे.
बातमी शेअर करा