Advertisement

इंधन दरवाढीचा भडका सुरूच

प्रजापत्र | Tuesday, 23/02/2021
बातमी शेअर करा

बीड -देशभरात पेट्रोल, डिझेलच्या दरांनी सामान्यांच्या खिशाला आग लावली आहे. गेले दोन दिवस इंधनाच्या दरात वाढ झाली नव्हती, मात्र मंगळवारी (दि.२३) पुन्हा ३५ पैशांची वाढ झाल्याने पेट्रोलचे दर वाढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दरवाढीला युपीए सरकारची धोरणे जबाबदार असल्याचे वक्तव्य केले होते. तर अर्थमंत्र्यांनी परिस्थिती गंभीर असून केंद्र आणि राज्याने चर्चा करून दर कमी करावेत असे म्हटले होते. 
             तेल कंपन्यांकडून दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी केले जातात. त्यानुसार गेल्या १२ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी बीडमध्ये पेट्रोल ९८.४४ तर डिझेल ८८.१७ च्या घरात गेले आहे.

Advertisement

Advertisement