Advertisement

लातूर मध्ये एकाच वसतिगृहातील 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

प्रजापत्र | Tuesday, 23/02/2021
बातमी शेअर करा

लातूर दि.23 - हिंगणघाट येथील सुमारे 100 विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचे उघड झाले होते. त्यातच आता लातूर शहरातल्या एकाच शाळेत तब्बल 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. 40 विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचं समोर आल्याने 320 विद्यार्थी, 10 शिक्षक आणि 20 कर्मचारी क्वारंटाईन झाले आहेत.एमआयडीसी भागात असलेल्या एका शाळेच्या वसतिगृहातील 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे विद्यार्थी शिक्षणासाठी  वसतिगृहात रहात आहेत.

               लातूरच्या एमआयडीसी भागात असणाऱ्या एका शाळेच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर इतर विद्यार्थ्यांची तपासणी केली असता तब्बल 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या विद्यार्थ्यांवर लातूरच्या शासकीय वसतिगृहात असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.

Advertisement

Advertisement