नाशिक-अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन-तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. असेही त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे त्यांनी नुकतीच आमदार सरोज अहिरे यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित होते.
छगन भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन-तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.विशेष म्हणजे त्यांनी नुकतीच आमदार सरोज अहिरे यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित होते. शरद पवार आणि भुजबळ एकाच मंचावर उपस्थित राहिल्याने आता शरद पवारांची देखील कोरोना चाचणी केली जाण्याची शक्यता आहे.
नेत्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून नेत्यांचे जनता दरबार रद्द करण्यात आले आहेत. नुकतंच विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी आयोजित केलेला जनता दरबार रद्द करण्यात आला आहे. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले.
बातमी शेअर करा