बीड-बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बँकेच्या राजकारणातील मातब्बर आज काय करतात आणि आज कोणा-कोणाचे अर्ज येतात याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी २० मार्च रोजी मतदान होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज (दि.२२) शेवटचा दिवस आहे. बँकेच्या १९ जागांसाठी रविवारपर्यंत ३० उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत, तर अनेक मतदारसंघासाठी आणखी एकही अर्ज आलेला नाही.त्यामुळेच आज कोण अर्ज दाखल करतात याची सर्वांना प्रतीक्षा आहे.
यावेळी आष्टी तालुक्यातून आ.सुरेश धस यांचे पुत्र जयदत्त धस निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी कोणाला उतरविणार हा प्रश्न आहे. तर बीड तालुक्यातून महाविकास आघाडी म्हणून उमेदवार येणार का आमदार आणि माजी मंत्री गट एकमेकासमोर येणार याचे संकेत देखील आजच मिळतील.केज तालुक्यासाठी रमेश गटाकडून कोणाची उमेदवारी येते आणि आ. प्रकाश सोळंके माजलगाव तालुक्यातून कोणाला संधी देणार हे देखील आजच कळू शकेल.पतसंस्था आणि नागरी बँक मतदारसंघातून विद्यमान अध्यक्ष आदित्य सारडा पुन्हा निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट आहे, त्यांच्या विरोधात कसे चित्र राहील हे देखील आज कळणार आहे.
बातमी शेअर करा