गेवराई-तालुक्यातील पांगरी येथे नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.मामानेच अल्पवयीन भाच्चीवर बलात्कार केला असून गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळनेर येथील रहिवासी असलेली १३ वर्षीय मुलगी आपल्या आत्याच्या घरी पांगरी तांड्यावर राहत होती.यावेळी आत्याच्या नवऱ्याने पिंपळनेर येथील अज्ञात लॉजवर या मुलीसोबत अतिप्रसंग केला.यानंतर पीडितेने सदर प्रकार आपल्या घरच्यांना सांगितल्यानंतर याप्रकरणी बुधवारी (दि.१७) रात्री उशिरा गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणातील आरोपी फरार असून पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक ए.डी.भोसले ह्या करीत आहेत .
बातमी शेअर करा