बीड-बीड पंचायत समिती सोबतच पाटोदा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार असलेल्या नारायण मिसाळ यांना 37 हजाराची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. नारायण मिसाळ यांच्या राहत्या घरी पथकाने ही कारवाई केली.
नरेगा अंतर्गत विहीरीचे बील मंजूर करण्यासाठी गटविकास अधिकारी नारायण मिसाळ यांनी 50 हजार रूपयांची लाच मागितली असल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. त्यानुसार एसीबीने नारायण मिसाळ यांच्या राहत्या घरी सापळा रचला. बुधवारी सायंकाळी 8.15 च्या सुमारास तक्रारदाराकडून 37 हजार रूपये घेताना नारायण मिसाळ यांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.
बातमी शेअर करा