Advertisement

 आता या राज्यात ही पेट्रोलचे शतक 

प्रजापत्र | Wednesday, 17/02/2021
बातमी शेअर करा

  बीड-देशात पहिल्यांदाच पेट्रोलचे दर १०० रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. राजस्थानातील श्रीगंगानगरमध्ये बुधवारी सकाळी पेट्रोलचे दर १०० रुपयांपेक्षा जास्त झाले.ऑईल कंपन्यांनी बुधवारी (दि.१७) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २५-२५ पैशांची वाढ केली आहे. सलग नवव्या दिवशी तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे.बीडमध्ये पेट्रोल ९७.११ तर डिझेल ८६.७६ च्या घरात गेले.  
या वर्षात २१ वेळेस पेट्रोल ५.८३ रुपये आणि डिझेल ६.१८ रुपये महाग झाले.फेब्रुवारीमध्ये आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ११ वेळेस वाढ झाली आहे. या दरम्यान दिल्लीत पेट्रोल ३.२४ रुपये आणि डिझेल ३.४७ रुपये महाग झाले. यापूर्वी जानेवारीत १० वेळेस इंधन दरवाढ झाली. या दरम्यान पेट्रोल २.५९ रुपये आणि डिझेल २.६१ रुपये महाग झाले होते. २०२१ मध्ये आतापर्यंत पेट्रोल ५.८३ रुपये आणि डिझेल ६.१८ रुपये प्रति लिटर महाग झाले आहे.दरम्यान राजस्थानामध्ये पेट्रोल १०१ रुपयांवर गेले आहे.
 

Advertisement

Advertisement