Advertisement

बीडमध्ये मोकाट श्वानांचे निर्बीजीकरण सुरू    

प्रजापत्र | Tuesday, 22/09/2026
बातमी शेअर करा

  बीड दि.२२(प्रतिनिधी): शहरातील मोकाट श्वानांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी,नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नगर परिषदेच्या वतीने मोकाट श्वानांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्याची मंगळवार (दि.२२) रोजीपासून मोहीम सुरु केली.
   मागील काही दिवसांपासून बीड शहरात लहान मुलांनवर मोकाट श्वानांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या होत्या.तसेच नागरिकांना देखील या श्वानांपासून त्रास होत होता.मोकाट श्वानांपासून अपघाताच्या घटना देखील वाढल्या होत्या यावर उपाय म्हणून निर्बीजीकरण आणि लसीकरण करावे अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत होती.याच अनुषंगाने आजपासून मोकाट श्वानांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण,लसीकरण करण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे.  

Advertisement

Advertisement