शिरूर कासार दि.११ (प्रतिनिधी):तालुक्यातील हिवरसिंगा येथील प्रयागराज नर्सरी समोरून दुचाकीवर जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील ७० हजारांचे मिनी गंठण अज्ञात चोरट्यांनी लंपास केळ्याची घटना गुरुवार (दि.१०) रोजी घडली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर कासार तालुक्यात घरफोडी,लूटमार यांसारख्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून याकडे पोलिसांची साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.पूजा विकास वारे (वय २१) रा.टाकळवाडी ता.शिरूर कासार ह्या दुचाकीवरून राजुरी नवगण येथील पोस्टातून टपाल घेऊन रायमोहकडे जात असताना हिवरसिंगा येथील प्रयागराज नर्सरी समोर अज्ञात दोन चोरट्यांनी गुरुवार (दि.१०) रोजी सकाळी १०:३० ते ११ च्या सुमारास त्यांच्या गळ्यातील ७० हजारांचे मिनी गंठण हिसकावून तेथून पसार झाले.पूजा वारे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोह.श्री.तांदळे हे करत आहेत.

