बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अद्याप सुरु असून रविवारी (दि.१४) २६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.विशेष म्हणजे यावेळी सहा तालुके कोरोनमुक्त राहिले.
जिल्ह्यातील ५५० संशयितांचे नमुने तपासणीसाठी अंबाजोगाईत पाठविण्यात आले होते.यात २६ जण बाधित सापडले असून ४२४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्हमध्ये बीड ९, अंबाजोगाई ९, आष्टी ६ , माजलगाव १ तर परळी तालुक्यातील एक रुग्णाचा समावेश आहे.तर उर्वरित शिरूर कासार,धारूर,गेवराई,पाटोदा,वडवणी तर केजमध्ये एकही रुग्ण पॉझिटिव्ह सापडला नाही.
बातमी शेअर करा