Advertisement

पुन्हा 'त्या' विहिरीत कोसळली कार;महिलेने दीड वर्षाच्या चिमुकल्याला बाहेर फेकल्याने वाचला जीव

प्रजापत्र | Sunday, 14/02/2021
बातमी शेअर करा

जालना-रविवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास एक कार देऊळगाव राजाकडे जात असतांना जामवाडी शिवारातील विहिरीत कोसळली. कार विहिरीत जात असल्याचे लक्षात येताच महिलेने दीड वर्षाच्या बाळाला गाडीतून बाहेर फेकल्याने त्याचा जीव वाचला आहे.तर कार पाण्यात बुडाल्यानंतर चालक व एक पुरुष पोहून बाहेर पडला. परंतू, एक महिला व चार वर्षाची मुलगी आतच अडकली. जालना तालुक्यातील जामवाडी गावाजवळ ही दुर्घटना घडली.

              दोन दिवसापूर्वी या विहिरीत कार पडून दुर्दैवाने बीडच्या दोघांचा मृत्यु झाला होता.त्यापाठोपाठ पुन्हा याच विहिरीत कार पडल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरु आहे. जखमींची नावे अद्याप कळू शकलेले नाहीत. 

 

 

 

Advertisement

Advertisement