मुंबई: लाडकी बहीण योजनेसाठी महायुती सरकारनं पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वापरला आहे. महिला आणि बाल विकास विभागाल सामाजिक न्याय विभागाकडून निधी वर्ग करण्यात आलाय. याबाबत शासन निर्णयसुद्धा जारी केला आहे. यामुळे लाडक्या बहिणींनी रक्षाबंधनच्या आधी हफ्ता मिळण्याची शक्यता आहे. रक्षाबंधनला लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे असे दोन्ही हफ्ते दिले जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वित्त विभागाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून महिला आणि बाल विकास विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. यासाठी ३१९.५३ कोटींचा निधी देण्यात आलाय. प्रशासकीय विभागाकडून याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आलाय. निधी वर्ग झाला असून येत्या काही दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे पाठवले जाऊ शकतात.रक्षाबंधन २८ ऑगस्टला असून त्याआधीच महिलांना लाडकी बहीणचे पैसे मिळणार आहेत. ऑगस्ट अर्धा संपला तरी जुलैचा हफ्ता देण्यात आलेला नाही. त्यामुळे आता जुलै आणि ऑगस्टचा हफ्ता एकत्रच दिला जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबत महिला आणि बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दोन्ही हफ्त्याचा लाभ एकत्र मिळेल असं म्हटलंय.फेब्रुवारी २०२५पासून लाडकी बहीणच्या लाभार्थ्यांची पडताळीण सुरू झालीय. त्यानंतर अपात्र महिलांचा लाभ बंद केला गेला. तर पात्र ठरलेल्या महिलांना १० ते १५ तारखेच्या आत महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ खात्यावर देण्याचं नियोजन करण्यात येतंय असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय.महिला आणि बालविकास विभागाकडून राज्यात लाडकी बहीणच्या लाभार्थी महिलांची पडताळणी केली गेली. यात अनेक अर्जांमध्ये कागदपत्रांची पूर्तता नव्हती, बँक खाते लिंक नसलेल्या आणि ईकेवायसी न केलेल्या महिलांना अपात्र ठरवण्यात आलंय. त्यामुळे पडताळणीत तब्बल ८० लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरल्यानंतर त्यांचा लाभ तात्पुरता बंद करण्यात आलाय.

बातमी शेअर करा
