Advertisement

ग्रामरोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात 

प्रजापत्र | Friday, 07/08/2026
बातमी शेअर करा

बीड-राज्याचे पोलीस महासंचालक बीडच्या दौऱ्यावर असताना एका ग्रामरोजगार सेवकाला तीन हजारांच्या लाच प्रकरणात एसीबीने रंगेहात पकडले आहे. बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
    गोविंद सोपान गोरे (वय-५०,व्यवसाय- ग्रामरोजगार सेवक ग्रा. पं. बनसारोळा) असे लाचखोर सेवकाचे नाव आहे. तक्रारदारकडे घरकुलच्या प्रकरणात ३ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी बीडच्या एसीबीकडे याची तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार एसीबीचे प्रभारी सोपान चित्तमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली बनेश्वर मंदिराजवळ सापळा रचून तीन हजार रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई समाधान बीडकर, काचगुंडे, अविनाश गवळी, गणेश मेहत्रे यांच्या वतीने करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement