Advertisement

कुख्यात आरोपी अखेर गजाआड

प्रजापत्र | Saturday, 13/02/2021
बातमी शेअर करा

गेवराई दि १३ ( वार्ताहार ) - दरोडा, मोक्क्यासारखे  गंभीर गुन्हे नोंद असताना तब्बल चार वर्ष पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीच्या अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी (दि.१३) रोजी पैठण (जि.औरंगाबाद) येथून मुसक्या आवळल्या आहेत.  
               दिपक गौतम पवार (वय ३५) वर्ष असे या आरोपीचे नाव असुन तो पैठण (जि.औरंगाबाद) येथील रहिवाशी आहे.त्याच्याविरोधात दरोडा,खूनाचा प्रयत्न करणे, तसेच मोक्का असे विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस तब्बल चार वर्षांपासून त्याचा मागावर होते.परंतु अनेकनवेळा त्याने पोलीसांना गुगांरा दिला होता. तो पैठण मध्ये असल्याची माहीती  बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच पो.नि. भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक पैठण येथे दाखल झाले व या कुख्यात आरोपीच्या मुसक्या आवळून त्याला गेवराई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास गेवराईचे पोलीस उपविभागीय  अधिकारी  स्वप्नील राठोड हे करत आहेत.  .

           

Advertisement

Advertisement