Advertisement

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यु 

प्रजापत्र | Tuesday, 14/07/2026
बातमी शेअर करा

 किल्ले धारुर दि.१४(प्रतिनिधी): येथील राष्ट्रीय महामार्ग ५४८(सी) वर माजलगावकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्त्यावर मॉर्निंग वॉकला जात असलेल्या शितल ज्ञानेश्वर ठोंबरे (वय ४२) यांना मंगळवार (दि.१४)रोजी सकाळी पाठीमागून जोराची धडक दिली. उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यु झाला.  
   धारूर पंचायत समितीचे माजी सभापती हनुमंत नागरगोजे यांची कन्या शितल ठोंबरे ह्या सकाळी ५.३० च्या दरम्यान मॉर्निंग वॉकला जात असताना धारूर येथील राष्ट्रीय महामार्ग ५४८(सी) वर माजलगावकडे जाणाऱ्या सुसाट व बेभान वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली.या अपघातानंतर नातेवाईक व नागरिकांनी उपचारासाठी अंबाजोगाईकडे तात्काळ हलवले. मात्र उपचारार्थ दाखल केल्यानंतर त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.त्यांच्या निधनामुळे धारुर शहर, घागरवाडा व तांबवा येथे शोककळा पसरली.त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा,मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर तांबवा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.पसार झालेल्या वाहनाचा पोलिस तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement