Advertisement

आर्थिक देवाण घेवाणीचीच भाषा करणाऱ्या सचिन बहिरला बदला

प्रजापत्र | Saturday, 20/06/2026
बातमी शेअर करा

बीड दि. १९ (प्रतिनिधी ): बीडच्या जिल्हाधिकारी कार्यलयांतर्गत आस्थापना विभाग सांभाळणाऱ्या सचिन बहिर या सहाय्यक महसूल अधिकाऱ्याकडून ग्राम महसूल अधिकारी (तलाठी ) आणि मंडळ अधिकाऱ्यांना प्रत्येक कामासाठी आर्थिक देवाणघेवाणीची भाषा वापरली जात असल्याचा गंभीर आणि खळबळजनक आरोप ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी संघटनेने केला असून त्याची आस्थापना शाखेतून इतरत्र बदली करावी अशी मागणी केली आहे. आता प्रशासन या तक्रारीची दाखल घेणार का तसेच 'बहिरे ' बनून राहणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
बीडचे जिल्हाधिकारी स्वतः कितीही पारदर्शी प्रशासनाचा आव आणत असले तरी कर्मचारी बदली आणि नियुक्तीसारख्या विषयात खुद्द त्यांच्याच कर्मचाऱ्यांना आर्थिक देवाणघेवाणीला सामोरे जावे लागत आह. विशेष म्हणजे हा आरोप खुद्द ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी संघटनेने केला आहे. आस्थापना विभागातील कर्मचारी सचिन बहिर हा आर्थिक देवाणघेवाण केल्याशिवाय कोणत्याच फाइल हलवत नाही असा दावा संघटनेने केला आहे. त्याची एकाच पदावर तीन वर्षापेक्षा जास्त सेवा झालेली असतानाही त्याला संरक्षण देण्यासाठी म्हणून दोन पदावधीचा निकष फेटाळला जात असल्याचा दावा देखील संघटनेने केला आहे. सचिन बहिरची तातडीने बदली करण्याची मागणी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली नाही.

 

Advertisement

Advertisement