Advertisement

समाधान खिंडकरच्या तक्रारीवरून दादा खिंडकरच्या विरोधात गुन्हा दाखल

प्रजापत्र | Thursday, 11/06/2026
बातमी शेअर करा

बीड दि.११(प्रतिनिधी): समाधान खिंडकर यास त्याचाच भाऊ दादा खिंडकर यांने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दादा खिंडकर आणि अनोळखी एक असे दोघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   नुकतीच खोटी फिर्याद दिल्यावरुन चर्चेत आलेल्या समाधान खिंडकर यांने पुन्हा भावाविरुद्धच मारहाणीची तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे बुधवारी (दि.१०) रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास दादा खिंडकर आणि एक अनोळखी व्यक्ती अशा दोघांनी पाईपने हातावर, पायावर व डोक्यावर जबर मारहाण केली. शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दादा खिंडकर आणि अनोळखी एक अश्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Advertisement

Advertisement