Advertisement

गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला ठोकल्या बेड्या 

प्रजापत्र | Monday, 01/06/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.१(प्रतिनिधी):शहरातील बार्शी रोडवरील महाराष्ट्र प्रकाश आंबेडकर नगर परिसरात धुलीवंदनाच्या दिवशी झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी तीन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पेठ बीड पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अखेर अटक केली आहे.  

   मिळालेल्या माहितीनुसार, शिल्लक कारणावरून अमोल कांबळे या तरुणाला डोंगरे कुटुंबीयांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत अमोल कांबळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध जीवघेणा हल्ला (कलम ३०७) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्यातील फरार आरोपी रोहन उर्फ कोल्ह्या शिवाजी डोंगरे (वय २१) याला गोपनीय माहितीच्या आधारे प्रकाश आंबेडकर नगर, इमामपूर रोड परिसरात सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. अटकेनंतर पुढील तपासासाठी आरोपीला पेठ बीड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.सदरील कारवाई पोलीस निरीक्षक मारोती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि शहा, पोह नितेश माने, पो.अं.श्री.गुजर,श्री.गिरी व श्री.परजने यांनी यांनी केली.
 

Advertisement

Advertisement