Advertisement

  खा.श्रीकांत शिंदेंना निवेदन देण्यासाठी आलेल्या वृध्दाचा हृदयविकाराने मृत्यु 

प्रजापत्र | Friday, 29/05/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.२९(प्रतिनिधी): खा.श्रीकांत शिंदे हे सध्या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज दुपारी खा.शिंदे यांची शिवसंवाद यात्रा केजमध्ये दाखल झाली. यावेळी खा.शिंदे यांना भेटून निवेदन देण्यासाठी गेलेले रसूल गफुर सय्यद (वय ६०) यांच्या अचानक छातीत दुखू लागले. त्यामुळे भर उन्हातच ते खाली बसले. आजुबाजूच्या लोकांनी त्यांची छाती आणि हात-पाय चोळून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र अचानक आलेल्या हृदयविकाराच्या तिव्र धक्याने रसुल सय्यद यांचा मृत्यु झाला. या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement