Advertisement

सुशिक्षित बेरोजगारांना मोठा दिलासा

प्रजापत्र | Thursday, 11/02/2021
बातमी शेअर करा
बीड दि.११ –  कर्मचारी निवड आयोग लवकरच सुरक्षा दलात भरतीसाठी कॉन्स्टेबल जीडी भरती परीक्षेची अधिसूचना जारी करणार आहे. SSC ने जाहीर केलेल्या परीक्षा कॅलेंडरनुसार कॉन्स्टेबल जीडी परीक्षेची अधिसूचना 25 मार्च 2021 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. या भरतीतून हजारो जणांना नोकरी मिळणार आहे. अधिसूचना जारी होताच नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. नोंदणीची अंतिम तारीख 10 मे 2021 निश्चित केली गेली आहे. तसेच कॉन्स्टेबल जीडीच्या पदांवर संगणक आधारित परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा कॅलेंडरनुसार ही परीक्षा 2 ऑगस्ट 2021 ते 25 ऑगस्ट 2021 दरम्यान घेण्यात येईल.
 
या भरती परीक्षेसाठी उमेदवाराने दहावी उत्तीर्ण केलेली असावी व उमेदवारांचे वय 18 ते 23 वर्षे असावे. सदरील भरती परीक्षेच्या माध्यमातून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), सीमा सुरक्षा दल (SSB), केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF), भारतीय तिबेट सीमा पोलिस, शास्त्रा सीमा बाल (ITBP), विशेष सुरक्षा दल, राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (NIA) , आसाम रायफलसह इतर सैन्यात भरती केली जाईल.
 
दरम्यान या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर इच्छुक आणि पात्र उमेदवार  ssc.nic.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकतात.

Advertisement

Advertisement