Advertisement

राज्यातील ७७ एपीआय झाले पीआय;बीडमधील तिघांचा समावेश

प्रजापत्र | Wednesday, 20/05/2026
बातमी शेअर करा

बीड-राज्यातील ७७ सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना पदोन्नती मिळाली असून यात बीडमधील तिघांचा समावेश आहे. काल पोलीस उपनिरीक्षक यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाची यादी जारी झाल्यानंतर आता एपीआय टू पीआयची यादी जाहीर झाली आहे.विशेष म्हणजे प्रमोशनच्या यादीत शिरूर आणि वाहतूक शाखेच्या प्रभारी अधिकाऱ्यांचे नाव आल्याने आता त्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार आहे.
       बीडमधील शांताराम ग्यानबा डंबाळे आणि दिलीप नामदेव खेडकर यांना पदोन्नती नाशिकला मिळाली तर प्रवीण रुस्तुम जाधव यांना मुंबई शहरला जावे लागणार आहे.सध्या दिलीप खेडकर हे बीडच्या वाहतूक शाखेचे प्रमुख होते.तर प्रवीण जाधव हे शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी होते.आता दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे शिरूर आणि बीडच्या वाहतूक शाखेला कोणत्या अधिकाऱ्यांची वर्णी लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत येत्या एक दोन दिवसांत नवीन अधिकाऱ्यांची रिक्त झालेल्या ठिकाणी नियुक्ती करण्याची शक्यता असून शिरूर आणि वाहतूक शाखेच्या प्रमुखपदासाठी कोणाचे नाव स्पष्ट होते हे लवकरच समोर येणार आहे.

 

Advertisement

Advertisement