Advertisement

कार-दुचाकीच्या अपघातात दोघे ठार

प्रजापत्र | Saturday, 16/05/2026
बातमी शेअर करा

 बीड दि .१६(प्रतिनिधी): तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी नगर-अहमदपूर मार्गावरील लिंबागणेश येथे शुक्रवारी मध्यरात्री कार, दुचाकीचा भीषण अपघातात  दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यु झाला. 
   बबन काशिनाथ लगास आणि ज्ञानदेव विष्णू लगास दोघे रा. चिखलबीड (ता. वडवणी) असे मयतांची नावे असल्याचे समजते.शुक्रवार (दि. १५) रात्री पावणे बारा
वाजण्याच्या सुमारास विस्टा कार क्र. एमएच ०५ एएक्स ०३८८ आणि हिरो स्प्लेंडर दुचाकी क्र. एमएच ४४ एए ६२२६ यांच्यात समोरासमोर धडक होऊन लिंबागणेश येथील भालचंद्र विद्यालय परीसरात अपघात घडला, हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील दोन्ही प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यु झाला. धडकेनंतर दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. नेकनूर पोलीस ठाण्याचे विठ्ठल राठोड व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालय, बीड येथे हलविण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले. राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी वर लिंबागणेश परिसरात वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

 

Advertisement

Advertisement