Advertisement

शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटन प्रमुखपदी सुवर्णा पाटील 

प्रजापत्र | Saturday, 16/05/2026
बातमी शेअर करा

धाराशिव - शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार कानेगाव जि प सदस्या सौ. सुवर्णा सतीशराव पाटील यांची शिवसेना महिला आघाडी सेना धाराशीव जिल्हा संघटन प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशीव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप  सरनाईक यांच्या हस्ते सुवर्णा पाटील यांना हे अधिकृत नियुक्तीपत्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.

 या प्रसंगी युवासेना धाराशीव लोकसभा प्रमुख आनंद पाटील, सतीशजी पाटील यांच्यासह शिवसेनेचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील कार्यासाठी कार्यकर्त्यांकडून  त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

 

 

 "पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री महोदयांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार घराघरांत पोहोचवणे हेच माझे मुख्य ध्येय असेल. 'बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवून संपूर्ण जिल्ह्यात महिला संघटन अधिक मजबूत करू', तसेच धाराशीव जिल्ह्यातील प्रत्येक महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी अहोरात्र काम करेन. कुठलाही मतभेद न ठेवता सर्व वरिष्ठ नेत्यांना तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा अधिक ताकदीने फडकवू, हाच माझा निर्धार आहे केला असल्याचे  नवनियुक्त महिला आघाडी जिल्हा संघटन प्रमुख सुवर्णा पाटील म्हणाल्या,

 

 

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती निवडीच्या वेळी सुवर्णा पाटील यांना ऐनवेळी डावलण्यात आले होते. या राजकीय घडामोडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली होती.पक्षाशी अत्यंत प्रामाणिक असलेले नेतृत्व असल्याने आनंद पाटील जराही डगमगले नाहीत. या निवडणुकीच्या वेळी पद डावलले गेले तरी त्यांनी नाराज न होता पक्षाचे काम अधिक जोमाने सुरू ठेवले. पद गेले तरी जनसंपर्क न तोडता त्यांनी कानेगाव मतदारसंघ आणि लोहारा तालुक्यात स्वतःची एक वेगळी 'क्रेझ' आणि विश्वासार्हता निर्माण केली अशी चर्चा रंगत असताना दिसत आहे.
  आनंद पाटील यांचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री मा ना एकनाथ भाई शिंदे आणि धाराशिव पालकमंत्री मा ना प्रतापजी सरनाईक यांच्याशी अत्यंत जवळचे व जिव्हाळ्याचे संबंध आहेत. या भक्कम पाठबळाच्या जोरावर त्यांनी कानेगाव मतदारसंघ आणि संपूर्ण लोहारा तालुक्यामध्ये विकासकामांचा धडाका लावला आहे. शेतकरी, महिला आणि तरुण मतदारांच्या प्रलंबित प्रश्नांचा शासन पातळीवर सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे मार्गी लावली आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न असो की तरुणांच्या रोजगाराचा विषय, आनंद पाटील नेहमीच जनसामान्यांसाठी धावून गेले आहेत. त्यांच्या याच अभ्यासू वृत्तीची, प्रामाणिकपणाची आणि दांडग्या जनसंपर्काची दखल घेऊन वरिष्ठ पातळीवर सुवर्णाताईंना थेट संपूर्ण जिल्ह्याचे महिला संघटन सांभाळण्याची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे असं नागरिकांतून बोललं जात आहे.

 

"काम थेट राज्यपातळीवरून मंजूर करून आणणारे नेतृत्व!"

 धाराशिव जिल्ह्यात  विशेषतः लोहारा तालुक्यातील तरुण, नागरिक, महिला, शेतकरी आणि सर्वसामान्य मतदारांमध्ये आनंद भैय्या पाटील यांच्या कार्यपद्धतीची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. "आनंद भैय्या हे लोहारा तालुक्याचे एक उमलते आणि अत्यंत वजनदार नेतृत्व आहे. त्यांचे राज्यपातळीवर मजबूत वजन असल्याने ते स्थानिक पातळीवरील रखडलेली कामे थेट मंत्रालय आणि मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तातडीने मंजूर करून आणू शकतात," अशी मोठी अपेक्षा आणि सार्थ विश्वास मतदारसंघातील नागरिक व तरुणांमधून व्यक्त केला जात आहे. या वाढत्या जन विश्वासामुळे आनंद पाटील यांची धाराशिव जिल्हयासह तालुक्यातील राजकीय लोकप्रियता कमालीची वाढली आहे.

Advertisement

Advertisement