Advertisement

सचिन पांडकर धाराशिवचे अप्पर पोलीस अधिक्षक

प्रजापत्र | Friday, 15/05/2026
बातमी शेअर करा

बीड-मागच्या तीन वर्षांपासून बीडच्या अप्पर पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या सचिन पांडकर यांची अखेर बदली झाली असून त्यांच्या जागी बीडला कोण येणार याकडे आता सर्वांचे लक्ष्य लागले आहे.पांडकर हे धाराशिवला अप्पर पोलीस अधिक्षक म्हणून रुजू होणार आहेत.
      बीडला येण्यापूर्वी सचिन पांडकर मुंबईतील मानवीहक्क अभियानचे पोलिस अधीक्षक होते.सुनील लांजेवार यांच्यानंतर त्यांची बदली तीन वर्षांपूर्वी बीडला झाली. मागच्या तीन वर्षात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जिल्ह्यात निर्माण झाल्यानंतर त्यांनी मोलाची भूमिका घेत जिल्ह्याचे वातावरण शांत केले. संयमी आणि मितभाषी असलेल्या सचिन पांडकर यांना बीड जिल्ह्यात सेवा करण्याचा सर्वाधिक कालावधी मिळाला आहे. पांडकर यांनी जिल्ह्यात केलेले कार्य जनतेच्या कायम स्मरणात राहणारे ठरणार असून लोकमंधील चेहरा म्हणून त्यांची ओळख होती.अखेर प्रदीर्घ कालावधीनंतर त्यांची बीडमधून बदली होतं आहे. त्यांच्या जागी आता कोणते अधिकारी येणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.मात्र पांडकर यांना धाराशिवचे अप्पर पोलीस अधिक्षक म्हणून  नियुक्ती मिळाली आहे. 

Advertisement

Advertisement