Advertisement

बीडमध्ये उपवर्गीकरणाविरोधात आंबेडकरी समाज एकवटला 

प्रजापत्र | Monday, 11/05/2026
बातमी शेअर करा
बीड दि.११ (प्रतिनिधी): अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात आंबेडकरी समाज आता आक्रमक झाला असून सरकारच्या धोरणाविरोधात बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आज सोमवार (दि.११) रोजी सकाळी ११ वाजता मोर्चा निघाला असून उपवर्गीकरणाविरोधात बीडमध्ये आंबेडकरी समाज एकवटल्याचे चित्र दिसले.
    उपवर्गीकरणाच्या माध्यमातून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत आंबेडकरी समाजाच्या विविध संघटनांनी आज सोमवार (दि.११) मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढला असून हा मोर्चा कोणत्याही जातीविरोधात नसून सरकारच्या धोरणाविरोधातील लढा असल्याचे स्पष्ट करत बदर समितीचा अहवाल तात्काळ जाहीर करावा, उपवर्गीकरणाची प्रक्रिया थांबवावी आणि जनतेला सूचना-हरकतींसाठी अधिक वेळ द्यावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Advertisement

Advertisement