Advertisement

भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक

प्रजापत्र | Friday, 08/05/2026
बातमी शेअर करा

गेवराई दि.८(प्रतिनिधी): तालुक्यातील कल्याण-विशाखापट्टणम हायवेवरील कोळगाव येथे भरधाव टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत पती-पत्नीचा शुक्रवार (दि.८)रोजी सायंकाळी जागीच मृत्यु झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
    मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर कासार तालुक्यातील निमगाव मायंबा येथील तुकाराम बळे व त्यांच्या पत्नी हे दोघे मोटारसायकल (क्र. एमएच १४ सीझेड ७२०९) वरून कोळगावहून आपल्या गावी परत जात होते. दरम्यान, कोळगावजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मादळमोही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले. या प्रकरणी संबंधित टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या दुर्दैवी घटनेमुळे निमगाव मायंबा गावावर शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement

Advertisement