Advertisement

शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना फरशीचा आधार

प्रजापत्र | Friday, 24/04/2026
बातमी शेअर करा

 केज दि.२४(प्रतिनिधी): तालुक्यातील विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेल्या रुग्णांना बेड नसल्याने चक्क फरशीवर झोपून उपचार घ्यावे लागत आहेत. यामुळे रुग्णांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. 
    विडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ऊसतोड मजूर महिलांवर कुटुंब कल्याणची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर बेड उपलब्ध नसल्याने अक्षरशः खाली फरशीवर झोपवून उपचार देण्यात येत आहेत. हा धक्कादायक प्रकार आज शुक्रवारी (दि.२४) समोर आला आहे. यामुळे ऊसतोड मजूर असलेल्या या रुग्णांची मोठी हेळसांड होत असल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान बेड उपलब्ध करून द्यावेत यासाठी आम्ही वरिष्ठांना कळविलेले आहे अशी प्रतिक्रिया वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

Advertisement

Advertisement