बीड दि.२०(प्रतिनिधी): शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात आज दुपारी एका घरात गॅस सिलिंडर बदलत असताना गॅस लिक होऊन अचानक भडका उडाला. घरातील देवघरात दिवा सुरू असल्याने लिक झालेल्या गॅसने पेट घेतल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
या घटनेत भारत माने हे जखमी झाले असून त्यांच्या चेहऱ्यावर व हातावर गंभीर भाजल्या गेल्या आहेत. घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमींना बाहेर काढले. माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून घरातील इतर सदस्य सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. जखमी भारत माने यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गॅस सिलिंडर बदलताना योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे

