Advertisement

मावा कारखान्यावर पोलिसांची कारवाई

प्रजापत्र | Saturday, 18/04/2026
बातमी शेअर करा

गेवराई दि.१८( प्रतिनिधी): शहरातील एका ठिकाणी चालू असलेला मावा तयार करण्याचा कारखान्यावर शनिवार(१८)रोजी कारवाई करत सुमारे २ लाख १२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

बीड पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशानुसार जिल्हाभर अवैध गुटखा विक्रीविरोधात कारवाई सुरू आहे. त्याच अनुषंगाने शनिवार(दि.१८) रोजी गेवराई पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, जावेद निजाम शेख (वय ३८), रा.संजयनगर, गेवराई हा आपल्या घरासमोरील खोलीत सुगंधित तंबाखूपासून मानवी आरोग्यास अपायकारक असा मावा तयार करून विक्री करत आहे.मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ छापा टाकत आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर पत्र्याच्या शेडजवळील खोलीची झडती घेतली असता प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, सुपारी व इतर घटकांचे मिश्रण करून तयार केलेला मावा, मिक्सर मशीन, मावा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडी मोठी यंत्रणा आणि इतर साहित्य असा एकूण २,२२,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई एफएसएल पथकाच्या उपस्थितीत करण्यात आली. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी अजय गाढे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ तसेच भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय उदगिरकर करीत आहेत.हे करत आहेत.सदरील कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके, पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि राम खोत, पोउपनि संजय उदगिरकर, पोह कल्याण राठोड,गणेश घोलप,अशोक हंबर्डे, गोरख डोके,जितेंद्र ओव्हाळ,कोंता शेळके तसेच अन्न सुरक्षा अधिकारी बीड अजय गाढे यांनी केली.

Advertisement

Advertisement