बीड दि.१७(प्रतिनिधी): बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच बुधवार (दि.१५) व १६ रोजी पाच ठिकाणी कारवाई करत ८,५०,००० मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. गुटखा विक्री प्रतिबंधाबाबत सर्व पोलीस ठाणे हद्दीत जनजागृती करूनही काही ठिकाणी अवैध गुटखा विक्री सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने दि. १५ एप्रिल व १६ एप्रिल २०२६ रोजी बीड शहर पोलीसांनी पाच विविध ठिकाणी कारवाई केली. या कारवाईत नामदार मोहिदीन शेख (रा. अक्सा मशिद जवळ, शहाशाह नगर, बीड), समशेर खान मुस्तफा खान (रा. गुलजार नगर, तकिया मशिद जवळ, बीड), मोमीन अब्दुल मुजिब (रा. किरणा दुकान, किशोर मेहता रोड, बीड), अफरोज यासीन तांबोळी (रा. इस्लामपुरा भाग, पंडित बंधू, बीड), लक्ष्मण दत्तूबा वाघुले (रा. नायगाव, ता. पाटोदा याच्या ताब्यातील कारमध्ये सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स, गुरुकृमा हाँटेल परिसर येथे गुटखा साठा आढळून आला या आरोपींकडून गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या कारवाईदरम्यान विविध कंपनीचा गुटखा, पान मसाला, मोबाइल फोन तसेच वाहन असा एकूण सुमारे ८,५०,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव तसेच पोलीस अंमलदार गहिनीनाथ बावनकर, सय्यद शहेनशहा, इलियास शेख, मंगेश शिंदे, राम पवार, फारुख शेख यांनी केली.

बातमी शेअर करा
