Advertisement

धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा पुन्हा इशारा- पालकमंत्री प्रताप सरनाईक

प्रजापत्र | Thursday, 02/04/2026
बातमी शेअर करा

 धाराशिव दि.२(प्रतिनिधी) : जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा सुरूच असून शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तीन दिवसांपूर्वी गारपिटीसह झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
       परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
काढणीला आलेल्या पिकांवर या पावसाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता असून प्रशासनही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement