मुंबई: अमेरिका-इस्त्रायल आणि इराण संघर्षाचे पडसाद आता जगासह भारताच्या बाजारपेठांत उमटताना दिसत आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीत नाकाबंदी करताच कच्चा तेल सह एलपीजीचे दर भडकले आहेत. याचा थेट परिणाम भारतात होताना दिसत असून केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरचा पुरवठ्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
सरकारने व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबविला आहे. यामुळे देशभरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड इंडस्ट्री उद्योग ठप्प होण्याची भीती आहे. तसेच यादरम्यान सर्व सामान्यांच्या खिशाला देखील इराण-इस्रायल संघर्षाची झळ बसली असून घरघुती गॅस सिलेंडरच्या किंमती ६० रूपयांनी भडकल्या आहेत. यामुळे ८६० रुपयांना मिळणाऱ्या सिलेंडरसाठी महाराष्ट्रात ९२० रुपये मोजावे लागणार आहेत. १४.२ किलोच्या घरघुती गॅस सिलेंडरसाठी नवे दर आजपासून लागू झाले आहेत.

