बीड दि.२८(प्रतिनिधी): मांजरसुंभा ते पाटोदा दरम्यान तालुक्यातील लिंबागणेश येथे शुक्रवार(दि. २७) रोजी साडेअकराच्या सुमारास अपघाताची घटना घडली. रात्री भायाळा येथील स्कॉर्पिओ (क्र.एमएच २० बीएन १५६५) या वाहनाने जामखेड येथील पोलिसांची जीप (क्र.एमएच १६ डीजी ६०८१) हिला पवार वस्ती जवळ पाठीमागून जोरदार धडक दिली. सदर पोलिस जीप बीड येथील कारागृहात आरोपीला पोहोचवून परत जात असताना हा अपघात झाला. धडकेनंतर पोलिसांचे वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात कोसळले. या अपघातात जीपमधील ४ ते ५ पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर जामखेड येथे वैद्यकीय उपचार सुरू आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेले भाऊराव शिंदे व विक्रांत वाणी यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान, पोलिस जीपला धडक
देणाऱ्या स्कॉर्पिओमधील चार ते पाच जण मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती पोलिस कर्मचाऱ्यांनी दिली आहे. घटनेनंतर नेकनूर व पाटोदा येथील पोलिस प्रशासनाने रात्रीच घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा
