बीड दि.२३(प्रतिनिधी): पाटोदा तालुक्यात जबरी घरफोड्या करणाऱ्यांना अट्टल तीन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करत त्यांच्याकडून एक दुचाकी रोख दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास पाटोदा पोलीस करत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारा मार्फत शुक्रवार (दि.२०)रोजी माहिती मिळाली की पाटोदा तालुक्यात जबरी घरफोड्या करणारे चोरटे , ज्योतीराम शरद भोसले (वय २५) रा. खांडवी ता. जामखेड जि. आहिल्यानगर व त्याचे दोन साथीदार राहुल काशिनाथ पवार (वय २०) रा. घोडेगाव ता. जामखेड जि. आहिल्यानगर, बनेश बाबुशा भोसले (वय २०) रा.खांडवी ता. जामखेड जि. आहिल्यानगर यांनी मिळून सदरचा गुन्हा केला असुन ते आज पाटोदा येथुन जामखेड कडे जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच पाटोदा येथे जावुन आरोपीची माहिती घेतली असता आरोपी दुचाकीवरून साकत मार्फे जामखेड येथे गेल्याचे समजले. पथकाने त्यांचा पाठलाग करून आरोपीस शिताफीने महासांगवीच्या शिवारात ताब्यात घेवुन त्यांच्याकडे विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी दोन लाख रूपये रक्कम जप्त करण्यात आली असून पुढील तपासासाठी पाटोदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच त्यांच्याकडून आणखीन गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नविनत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक बीड सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक स्थागुशा बीड शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि खटावकर, पोह. सोमनाथ गायकवाड, पोह. बाळु सानप, पोह. राहुल शिंदे, पोअ. अर्जुन यादव, पोअ. मनोज परजणे यांनी केली.

