Advertisement

 बुलेट आणि स्कुटीचा अपघात 

प्रजापत्र | Sunday, 22/02/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.२२(प्रतिनिधी): बुलेट आणि स्कुटीची समोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातात स्कुटीवरील शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी १  च्या सुमारास  शहरापासून जवळच असलेल्या बीड-पेंडगाव रोडवरील मिनी बायपास कॉर्नरवर घडली.
    बीड शहरापासून जवळच असलेल्या मिनी बायपास कॉर्नरवर भरधाव वेगातील बुलेट क्रमांक एम.एच.१२. एन.एल. ३७१४ आणि स्कुटी क्रमांक एम.एच.२३.४०५० या दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात स्कुटीवरील विष्णू बाबुराव शिंदे (वय ५०) रा. पेंडगाव ता. बीड यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन त्यांना जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली.

Advertisement

Advertisement