Advertisement

अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी होणार

प्रजापत्र | Wednesday, 28/01/2026
बातमी शेअर करा

महाराष्ट्राला हदरवणारी बातमी आज सकाळी समोर आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा आज (बुधवारी, ता २८) बारामती या ठिकाणी मोठा अपघात झाला आहे. या विमान अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांचं विमान शेतात कोसळलं, त्यानंतर विमानाला भीषण (Ajit Pawar Baramati Plane Crash) आग लागली. या भीषण दुर्घटनेत अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजित पवारांसह या विमानात असलेल्या ५ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) दिली आहे.(Ajit Pawar Baramati Plane Crash) या घटनेनंतर राज्यभरातून हळहळ व्यक्त होत आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करत माझा मोठा भाऊ गेला. अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे. कुणी स्वप्नातही असा विचार केला नव्हता, असं म्हटलं आहे. तर या दुर्दैवी अपघाताची चौकशी व्हावी असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

अपघाताची चौकशी व्हावी
आमच्या सहकाऱ्याचा जीव या विमान दुर्घटनेत गेला आहे, पाच ते सहा जणांचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे या विमान अपघाताची चौकशी नक्कीच होईल, नक्कीच झाली पाहिजे, कारण यापुढे देखील अशा प्रकारच्या अपघात होता कामा नये यासाठी हे गरजेचं आहे, आणि तसेच या अपघाताची चौकशी देखील होईल अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

Advertisement

Advertisement