Advertisement

'ड्रॉ"च्या माध्यमातून गोल्ड योजनेचे फुटले पेव

प्रजापत्र | Sunday, 07/02/2021
बातमी शेअर करा

नेकनूर दि.७ अशोक शिंदे
बोलणाऱ्या च्या आंबड्या विकतात पण मात्र न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकत नाहीत अशी एक जुनी म्हण आहे. ग्राहकांना प्रलोभन दाखवून दर्जाहीन माल खपवण्याचा ट्रेंड मागच्या कांही वर्षांपासून सुरू आहे.आणि त्यातच आणखी भर म्हणून की काय सध्या  सोने विक्री साठी अनेकजण सध्या नामी शक्कल लढवून ड्रॉ च्या माध्यमातून गोल्ड योजना काढत, वेगवेगळे अमिष दाखवून सोने खरेदीसाठी ग्राहकांना आकर्षित करण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचे दिसत आहेत.
             
सोने दिवसेंदिवस महाग होत चालले असून सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य आर्थिक परिस्थिती असलेले लोक सोने खरेदीपासून चार हात लांब राहत आहेत. परिणामी सोने विक्री मंदावली असून उखळ पांढरे करणाऱ्यांची दुकाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र यावर पर्याय म्हणून कांही महाभागांनी नामी शक्कल लढवली आहे.

         जे लोक एकरकमी पैसे देऊन सोने खरेदी करू शकत नाहीत अश्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ड्रॉ नावाचे अमिष दाखवणे सुरू झाले आहे. १५ ते २० महिने ठराविक हफ्ते भरायचे अन तेवढ्या किमतीचे सोने घ्यायचे अश्या कांही योजना काढून सर्वसामान्य ग्राहकांच्या माथी दर्जाहीन अन भेसळयुक्त सोने मारण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. यामध्ये जेवढे हफ्ते तेवढे ड्रॉ काढून पंधरा वीस ग्राहकांना खुश करायचे अन उर्वरित दोन तीनशे ग्राहकांच्या हफत्यावर आपली पोळी भाजायची ही रणनीती जोर धरू लागली आहे.

      दरम्यान ड्रॉ च्या शेवटी जे सोने दिले जाते ते इतर कुठल्याच ठिकाणी विकल्या जात नाही, त्यावर भरमसाठ कर लावला जातो, कुणाच्याने काही हप्ते नाही भरणे झाले तर त्याला ड्रॉ मधून काढून त्याने कांही हप्ते भरलेली रक्कमही गिळंकृत केली जाते. त्यामुळे ड्रॉ नावाच्या आमिषाला बळी पडलेल्या ग्राहकांना फायदा तर सोडाच जेवढे पैसे भरलेले असतात त्यातही तोटा सहन करावा लागतो. मात्र जिल्ह्यात बेकायदेशीरपणे असे प्रकार राजरोस सुरू असून पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. एवढेच काय तर कित्येक ड्रॉ काढणारे पैसे घेऊन पसार झाल्याचे प्रकार बीड जिल्ह्यात अनेकवेळा घडलेले आहेत. अश्या नियमबाह्य ड्रॉ अमिषावर प्रतिबंध घालण्याची मागणी होत आहे.

नेकनूर च सोन कुठंच मोडत नाही

     नेकनूर येथील सोन्याच्या दुकानातून २४ कँरेट  सोने खरेदी केले काय अन कुठल्याही कँरेट चे एक नंबर भाव देऊनही खरेदी केलेले सोने बाहेर कुठल्याच दुकानात मोडी साठी घेतले जात नसल्याचे अनेकांनी बोलून दाखवल्याने नेकनूर च्या सोन्याच्या झळाकळीला बाहेर कवडीमोल किंमत मिळत असल्याने या कडे कोणी लक्ष देईल काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Advertisement

Advertisement