Advertisement

भररस्त्यात भाजप नेत्याच्या तोंडाला काळे फासून शिवसैनिकांकडून चोप

प्रजापत्र | Sunday, 07/02/2021
बातमी शेअर करा

पंढरपूर-पंढरपूरमध्ये शिवसैनिकांनी भाजपच्या माजी शहराध्यक्षाच्या तोंडाला काळे फासून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजप आमदार राम कदम यांनी याबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून, सत्ताधारी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर शहराचे माजी भाजप अध्यक्ष शिरीष कटेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे पंढरपूरमधील नाराज शिवसैनिकांनी शिरीष कटेकर यांना भर रस्त्यात तोंडाला काळे फासून विठ्ठल मंदिर परिसरात धिंड काढली. यावेळी शिवसैनिकांनी कटेकर यांना चोप देत त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार पोलिसांसमोर घडला.

Advertisement

Advertisement