बीड दि.११ (प्रतिनिधी ): प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिक कमकुवत असणार्या नागरीकांना घरकुल दिले जात आहे. आजची महागाई पाहता तेवढ्या पैशामध्ये घरकुल बांधणं होत नसल्याने राज्य सरकारने ५० हजार रूपयांची वाढ केली होती. त्याचा जीआर नुकताच आला असून घरकुल लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत देशात दरवर्षी लाखो नागरीकांना घरकुल दिले जात असतात. घरकुलासाठी निधी कमी येत असल्याने तेवढ्या पैशामध्ये घरकुल होत नसल्याच्या तक्रार समोर आल्यानंतर राज्य सरकारने त्यात आपला सहभाग नोंदवला. ४ एप्रिल २०२५ रोजी राज्य सरकारने ५० हजार रूपये देण्याची घोषणा केली होती. त्याचा जीआर अद्याप आला नव्हता. काल त्याचा जीआर आला असून दुसर्या टप्प्यातील ज्या घरकुल धारकांनी घरकुल बांधलेले आहेत. त्या लाभार्थ्यांना या ५० हजारांचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारने ज्या प्रमाणात घोषणा केली होती त्याची अंमलबजावणी केल्याने घरकुल धारकात समाधान व्यक्त केले जात आहे.

