Advertisement

शहर पोलीस 'शीतल';जुगाऱ्यांना पूजा पवारांचा दणका 

प्रजापत्र | Wednesday, 15/10/2025
बातमी शेअर करा

बीड-बीडच्या बसस्थानकाच्या समोर सुरु असलेल्या तब्बल तीन ऑनलाईन जुगाऱ्यावर कारवाई करून डीवायएसपी पूजा पवार यांनी पहिला दणका दिला आहे. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरणाऱ्या या जुगाऱ्यांच्या जत्रेकडे शहर पोलीस च 'शीतल' झाल्यामुळे डीवायएसपी यांना आक्रमक होऊन कारवाया कराव्या लागल्या.
    शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या अंडा ऑम्लेट च्या गाड्याशेजारी प्ले बुक नावाचा ऑनलाईन जुगार सुरु होता.याची माहिती मिळाल्यानंतर डीवायएसपी पूजा पवार यांनी आपल्या टीमसह कारवाई केली. तर दुसरी कारवाई इथून जवळच असलेल्या मानसी मोबाईल शॉपीच्या तिथे देखील करण्यात आली. तर तिसरी कारवाई लाईफलाईन हॉस्पिटल च्या खाली करण्यात आली आहे. या कारवायात हजारों ची नगदी रोकड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु असून शहर पोलीस'शीतल' पडल्याने डीवायएसपी यांनाच आक्रमक व्हावे लागले आहे. पोलिसांच्या कारवाईत 15-20 जणांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई अनिल घट मळ, अनंत गिरी, सचिन आगलावे यांच्यासह इतरांनी केल्याची माहिती आहे.

Advertisement

Advertisement