Advertisement

अखेर बीडच्या कारागृह अधीक्षकांची बदली

प्रजापत्र | Wednesday, 15/10/2025
बातमी शेअर करा

बीड : कारागृहातील कैद्यांचे सक्तीने धर्मांतरण करण्याच्या प्रयत्नांचा आरोप असलेल्या बीड कारागृहाच्या वादग्रस्त कारागृह अधीक्षकाची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड ला उपाधीक्षक म्हणून नागपूरला पाठविण्यात आले आहे. 
बीड कारागृहात आल्यापासून पेट्रस गायकवाड कायम वादग्रस्त ठरले होते. कारागृहातील झाडे तोडणे, कैद्यांकडून खाजगी कामे करून घेणे यासोबतच पेट्रस गायकवाड वर सक्तीने धर्मांतरण करण्याच्या प्रयत्नांचा आरोप होता. या पार्श्वभूमीवर आ. गोपीचंद पडळकर आणि इतरांनी तक्रारी देखील केल्या होत्या. अखेर शासनाने त्यांची उचलबांगडी केली. 

Advertisement

Advertisement