Advertisement

तेरा वर्षांच्या मुलीवर जन्मदात्याचा अत्याचार

प्रजापत्र | Saturday, 25/10/2025
बातमी शेअर करा

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur Abuse Case) जिल्ह्यातील करवीर तालुक्यात बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. स्वतःच्या तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या बापानेच धारदार शस्त्राचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा प्रकार उघड केला आहे. करवीर पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत. माणुसकीला कायम फासणारी घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. नराधम बापाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी महिला संघटनासह सामाजिक संस्थांनी केली आहे.
     नराधम बापाच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीची आई आणि दोन लहान मुले कोल्हापूर येथील एका उपनगरात वास्तव्याला होते. मुलीची आई भंगार गोळा करून मुलांचा सांभाळ करीत होती. मात्र, दिवाळी तोंडावर असल्याचे कारण पुढे करून नराधामाने तेरा वर्षांच्या मुलीला गावी नेले.दरम्यान, शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी साडेसात वाजता आणि बुधवारी (दि.२२) पहाटे नरारामाने धारदार शस्त्राचा धाक दाखवून स्वतःच्या तेरा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. या घटनेची वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही माथेफिरूने पीडित मुलीला दिली. मुलीने हा प्रकार आईला सांगतात त्यांनी करवीर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.

Advertisement

Advertisement