गेवराई दि.१० (प्रतिनिधी ):तालुक्यातील मादळमोही येथून टेम्पोतून अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी मंगळवार (दि.७)रोजी कारवाई केली.यात ७,०६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्हयात मागील काही दिवसांपासून अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांनी कारवाईचा सपाटा सुरु केला असून.गेवराई तालुक्यातील मादळमोही येथून टेम्पोच्या साहाय्याने अवैध वाळूची वाहतूक करताना हायवा चालक दादाराव दत्तू राठोड (वय २९) रा.रामनगर तांडा ता.गेवराई जि.बीड याच्यावर गेवराई पोलिसांनी गुरुवार (दि.९) रोजी कारवाई केली. यात टेम्पो (क्र. एम.एच. २३ ए.यू. ७०२९) अंदाजे किंमत ७०,०००० त त्यामध्ये एक ब्रास वाळू अंदाजे किंमत ६००० रुपये असा एकूण ७,०६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.असून पुढील तपास गेवराई पोलिस करत आहेत.