Advertisement

अज्ञाताने सोयाबीनला लावली आग

प्रजापत्र | Friday, 24/10/2025
बातमी शेअर करा

 माजलगाव दि.२४ (प्रतिनिधी):- तालुक्यातील फुले पिंपळगाव येथील एका शेतकर्‍याने शेतातील सोयाबीन काढून टाकली असता अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री ती जाळून टाकलीची घटना घडली असून या घटनेमुळे शेतकर्‍याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
    माजलगाव तालुक्यातील फुले पिंपळगाव शिवारात सुरेश सोपानराव साळवे यांची दीड एक्कर जमिन आहे.सोयाबीनची कापणी करुन याच शेतात सोयाबीन झाकून ठेवली होती. गुरुवार (दि.२३) रोजी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने संपूर्ण सोयाबीन जाळून टाकली. ही घटना सकाळी सुरेश यांची बहीण पुष्पा साळवे या शेतात गेल्यानंतर त्यांना समजली. यानंतर त्यांनी भाऊ सुरेश साळवे यांना कळवले असता. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व सदरील संपूर्ण सोयाबीन अज्ञात व्यक्तीने जाळून टाकल्याचा प्रकार निदर्शनात आला असून त्यांनी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

Advertisement

Advertisement