Advertisement

तलाठ्याला हाताखाली धरून बहिणीने भावाची जमीन हडपली

प्रजापत्र | Friday, 17/10/2025
बातमी शेअर करा

 बीड दि.१७ (प्रतिनिधी ): तलाठ्याला हाताखाली धरून चुलत बहिणीने भावाची ०.६० आर जमीन स्वत:च्या नावावर करून घेतली. सदरील हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी तलाठ्यासह बहिणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      रामदास मारुती मोरे रा. वायभटवाडी ता. बीड यांची चुलत बहीण रत्नमाला बाजीराव मोहिते हिने वायभटवाडीचे तत्कालीन तलाठी सध्या मंडळ अधिकारी नांदूर घाट ता.केज जि.बीड येथे कार्यरत असलेले एस.एन पठाण यांना हाताखाली धरून गट नं. २५६ मधील०.६० आर जमीन स्वत:च्या नावावर करून घेतली. सदरील हा प्रकार मोरे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुरुवार (दि.१६) रोजी तक्रार दाखल केली. त्यानुसार तलाठी एस.एन पठाण व चुलत बहीण रत्नमाला मोहिते यांच्या विरोधात फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.  

Advertisement

Advertisement