गेवराई दि.४ (प्रतिनिधी):तालुक्यातील (Georai)म्हाळसपिंपळगाव येथून टेम्पोच्या साहाय्याने अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच शुक्रवार (दि.३) रोजी कारवाई करत ८,०६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अज्ञात आरोपी विरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड (Beed)जिल्हयात मागील काही दिवसांपासून अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांनी कारवाईचा सपाटा सुरु केला असून. गेवराई तालुक्यातील म्हाळस पिंपळगाव येथे टेम्पोच्या साहाय्याने अवैध वाळूची वाहतूक करताना अज्ञात टेम्पो चालकावर गेवराई पोलिसांनी( Georai Police) (दि.३) शुक्रवार रोजी कारवाई केली.पोलिसांना पाहताच टेम्पो चालक पसार झाला असून यात एक विनानंबर अशोक लेलॅंड कंपनीचा पांढऱ्या रंगाचा बडा दोस्त टेम्पो अंदाजे किंमत ८,००,००० व त्यामध्ये एक ब्रास वाळू अंदाजे किंमत ६००० रुपये असा एकूण ८,०६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.असून पुढील तपास गेवराई पोलिस करत आहेत.