Advertisement

पुरामुळे संकटात सापडलेल्या बळीराजासाठी शिर्डी साई संस्थान धावले

प्रजापत्र | Sunday, 28/09/2025
बातमी शेअर करा

मराठवाड्यात पावसाने थैमान घातले असून पूराने जमिनी, घरे दारे वाहून गेल्याने शेतकरी संकटात आहे. या संकटातून बळिराजाला सावरण्यासाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. शेगावच्या संत गजानन महाराज संस्थानने एक कोटींची मदत जाही केल्यानंतर आता शिर्डीचे साईबाबा संस्थान देखील शेतकऱ्यांच्या मदतीला धावले आहे. संस्थानने पूरग्रस्तांसाठी १ कोटींची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
     मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेथील परिस्थिती अतिशय बिकट आहे. हजारो नागरिक बेघर झाले आहे. नैसर्गिक आपत्ती भीषण असून राष्ट्रीय कर्तव्य समजून पूरग्रस्तांसाठी १ कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय साईबाबा संस्थानच्या वतीने घेण्यात आला आहे.मराठवाड्यात या मोसमातील सर्वाधिक पाऊस झाला आहे. मागील चार दिवसांपासून मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडत आहे.मुसळधार पावसामुळे पिकांची कापणी होण्याआधीच पाणी शेतात साचले.त्यामुळे आधीच खर्च करून उभे केलेले पीक वाया जाण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या उध्वस्त झाले आहेत. अतिवृष्टीमुळे २७ लाख हेक्टरपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच २ हजारपेक्षा जास्त जनावरे मरण पावली आहेत तर सुमारे १०० लोकांनी आपला जीव गमावला आहे.

Advertisement

Advertisement