Advertisement

मुसळधार पावसाने बीडमधील अनेक भाग पाण्याखाली

प्रजापत्र | Saturday, 27/09/2025
बातमी शेअर करा

बीड दि.२७ (प्रतिनिधी): मध्यरात्री बारा वाजल्यापासून धुवॉधार पावसाला सुरुवात झाल्यानंतर बिंदुसरा नदीकाठच्या लोकांनी रात्र जागून काढली.बिंदुसरा नदी दुथडी वाहत असून शहरातल्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. अनेकांच्या घरात, व्यवसायिकांच्या दुकानात पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे नुकसान झाले आहे.
    शहरातील  शिवाजी धांडे नगर, मुक्ता लॉन्सच्या पाठीमागील बाजूचा सर्व परिसर तसेच जालना रोड जलमय झाल्याचे दिसून येत असून गुडघ्यापेक्षा वर जिथे तिथे पाणी साचले आहे. घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाणे, ग्रामीण पोलीस ठाणे इथेही तीच परिस्थिती आहे. इकडे खासबाग, लेंडी रोड, बिंदुसरा नदी काठच्या गावांमध्येही अशीच भयावह परिस्थिती आहे. येथील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन केले आहे.

Advertisement

Advertisement